‘प्रवरा’चा शंभर टक्के निकाल : डॉ. निर्मल
सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत {नोव्हेंबर-डिसेंबर २०१८} घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ यांनी दिली.
यामध्ये प्रथम वर्षातील श्रद्धा काशिद स्नेहल राहटे, अंजली सोनवणे, द्वितीय वर्षातील चैताली काळे, कांचन जंगम, दिपाली गाडेकर, आणि तृतीय वर्षातील प्राजक्ता तांबे, प्रभाकर कातकाडे, सोनाली अंत्रे, तसेच अंतिम वर्षातील आरती आढाव, पूनम लोखंडे आणि अक्षय यादव हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम राखली. या विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन सुजय विखे, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, भारत घोगरे, डॉ. हरिभाऊ आहेर, प्राचार्या. डॉ. प्रिया राव आदींनी अभिनंदन केले.