Breaking News

नाथभक्तांचे नाथसागरात पवित्र स्नान


नाथषष्टी उत्सवामधे आलेल्या लाखो वारकरी नाथभक्तांनी गोदावरीचे पवित्र स्नान करण्यासाठी नाथसागरावर प्रचंड गर्दी केली होती. वाळवंटातील व शहरातील फडावर थांबलेल्या भाविकांनी नाथसागराच्या अथांग पसरलेल्या पाण्यात पहिल्या दिंडीच्या निमित्ताने शाही स्नान केले. 

षष्ठीच्या दिवशी पहिल्या लाखो वारकऱ्यांची नाथसागर जलाशयाकडे पहाटेपासूनच रिघ लागली होती. वाळवंटात विसावलेल्या दिंड्या तसेच पैठण शहरातील इतर ठिकाणी थांबलेल्या वारकरी भाविकांनी नाथसागर जलाशयात स्नान करून संत एकनाथ महाराजांच्या राहत्या वाड्यातील विजयी पांडुरंगाचे तसेच नाथांच्या समाधी मंदिरातील पादुकांचे दर्शन घेत नगर प्रदक्षिणा केली. पैठणमधे सकाळपासून गर्दीच्या ठिकाणी तसेच नाथसागरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर होती.