Breaking News

लोकसभेत अविश्‍वास प्रस्ताव नाहीच

नवी दिल्ली : प्रचंड गदारोळामुळे बुधवारी पुन्हा एकदा लोकसभेत अविश्‍वास प्रस्ताव आणणे शक्य झाले नाही. आज लोकसभेत प्रचंड गदारोळ आणि निदर्शने पाहायला मिळाली. एवढेच नाही, तर एआयएडीएमकेच्या सदस्यांनी लोकसभाध्यक्षांच्या मंचाजवळ जाऊन निदर्शने केली.


प्रचंड गदारोळ होत असल्याने नाराज झालेल्या लोकसाभाध्यक्षा सुमित्रा महाजन म्हणाल्या, की जर गदारोळ थांबवला नाही, तर त्यांना बजेट सेशनदरम्यान सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागेल. दिवसाच्या सुरूवातीपासूनच लोकसभेच्या कामकाजात अडथळा यायला सुरूवात झाली त्यामुळे काही मिनिटांतच सभागृहाचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थिगित करण्यात आले होते. यानंतर महाजन यांनी प्रश्‍नोत्तराचा तास घेण्याचाही प्रयत्न कला. मात्र, ते शक्य होऊ शकले नाही. यानंतर 12 वाजता पुन्हा सर्वजण सभागृहात एकत्र आले. मात्र यावेळीही दृष्य वेगळे नव्हते. यावेळीही एआयएडीएमकेचे सदस्य निदर्शने करत लोकसभाध्यक्ष्यांच्या मंचाजवळ गेले. यानंतर पुन्हा सुमित्रा महाजन यांनी, अशा पद्धतीने आपण सभागृहाचे कामकाज का चालवायचे, असा सवाल केला आणि दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगीत केले.