Breaking News

संवत्सर रेल्वेस्थानक सुरू करा : मागणी


कोपरगांव : प्रतिनिधी  - मनमाड दौंड रेल्वेमार्गावर ब्रिटिश काळापासून कोपरगांव रेल्वेस्टेशन परिसरातील संवत्सर रेल्वेस्थानक सुरू होते. मात्र अलीकडेच ते बंद करण्यात आले. प्रवाशांना याच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे रेल्वेस्थानक तात्काळ सुरू करावे. अन्यथा या प्रकरणी आंदोलन करण्यात येई, असा इशारा संवत्सर रेल्वेस्टेशन प्रवासी संघटनेचे प्रभाकर ससाणे यांनी केली. 

यासंदर्भात ससाणे यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक सोलापूर आणि रेल्वेमंत्री, नवीदिल्ली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे, संवत्सर रेल्वेस्थानक पुन्हा कायमस्वरूपी सुरू व्हावे, यासाठी थेट सोलापूर येथे जाऊन विभागीय रेल्वेप्रबंधकांची भेट घेतली. खा. सदाशिव लोखंडे यांच्यामार्फत पाठपुरावा करण्यात आला. हे रेल्वेस्थानक बंद केल्याने गोरगरीब आणि मध्यमवर्गीय रेल्वेप्रवाशांची मोठया प्रमाणांत अडवणूक होत आहे. हे रेल्वेस्टेशन बंद केल्याने त्यांना कोपरगांव रेल्वेस्टेशनला वा कान्हेगांव श्रीरामपूर येथे जावे लागते. पर्यायांने त्यांना खाजगी वाहतुकीसाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहे.