Breaking News

सोमय्या’मध्ये बौद्धिक संपदा अधिकार कक्ष


कोपरगांव : श. प्रतिनिधी - येथील के . जे. सोमैया महाविद्यालयातील वाणिज्य विभागाअंतर्गत बौद्धिक संपदा अधिकार कक्षाची (Intellectual Property Right Cell ) स्थापना करण्यात आली. यावेळी सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, डॉ. बी. एस. यादव, उपप्राचार्य प्रा. संतोष पगारे आदींसह प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना प्राचार्या डॉ. गुरसळ म्हणाल्या, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात बौद्धिक संपदेची जपणूक करणे खूप मह्त्वाचे आहे. देशातील विविध शोधांचे पेटंट घेऊन उत्पादनाचा मालकी हक्क टिकवून ठेवणे महत्वाचे आज युरोपीय देशांमध्ये भारतातील वस्तूंचे पेटंट तिकडचे लोक घेत आहेत. यामुळे आपल्या देशातील लोकांच्या हक्कावर गदा येत आहे. या स्पर्धेची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी कॉपीराईट, पेटंट, ट्रेड मार्कस या क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करावे व समाजामध्ये जनजागृती करावी.

यावेळी प्राचार्य डॉ. बी. एस यादव यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एस. एल. अरगडे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन प्रा. भारती खैरनार यांनी केले. याप्रसंगी प्रा. धनवटे, प्रा. वर्षा पाचोरे, प्रा. अतुल घोलप, प्रा. कोळपकर आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. आर. ए. जाधव यांनी आभार मानले.