Breaking News

मोहरीच्या माजी सरपंचाचा विजेच्या धक्याने मृत्यू


विहीरीच्या पाण्यातील शेतीपंपाची मोटार काढण्यासाठी गेलेल्या मोहरीचे माजी सरपंच चिंतामणी बाबु येळे (वय 36 वर्षे) रा. मोहरी यांचा विजेच्या धक्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला आकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


या बाबत अधिक माहिती अशी की, मयत मोहरी गावचे माजी सरपंच चिंतामणी बाबु येळे दि. 11 मार्च रोजी सकाळी आपल्या गावातील मोहरी तलावाच्या जवळील देवीच्या मंदिर परिसरातील आसलेल्या शेताला पाणी देण्यासाठी गेले होते. या वेळी विहीरीचे पाणी कमी झाल्याने विहीरीची मोटर पुन्हा तळाच्या पाण्यात सोडण्यासाठी गेले होते. याच दरम्यान विजेच्या वायरचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना त्यांची पत्नी शेतातील विहीरीजवळ आल्यावर लक्षात आली. या नंतर ग्रामस्थांनी त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. माजी सरपंच चिंतामणी बाबु येळे हे मागील सन 2011-12 साली मोहरी गावचे सरपंच म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्‍चात 1 मुलगा, 1 मुलगी पत्नी असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास पोलीस हवालदार नवनाथ भिताडे हे करत आहेत.