आधारभूत किमतीत होणार मजूरांच्या श्रमाचा समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिकांच्या किमान आधारभूत किमतीवर जाहीर भाष्य केले. सरकार आधारभूत किंमत ठरवताना जनावरे किंवा मशीनवरील खर्च, बियाणे, सिंचन, मजूर या सर्वांवर केल्या जाणार्या खर्चाचा एकत्रितपणे विचार करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित करण्यात केलेल्या ’कृषी उन्नत महोत्सवा’चे उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी कृषीविषयक महत्त्वपूर्ण गोष्टींवर भाष्य केले.
पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सेंद्रीय शेतीवर भर देण्याची गरज व्यक्त केली. तसेच सौर ऊर्जेवर कृषी तसेच टाकाऊ घटकांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकारातून आतापर्यंत 11 कोटी माती परीक्षण कार्डांचे वितरण करण्यात आले असून यात संकलित केलेल्या माहितीचा उपयोग कृषी उत्पन्न वाढीसाठी होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या दशकभरात पंतप्रधान सिंचन योजनेखाली हाती घेण्यात आलेले प्रकल्प अपूर्ण होते. मात्र, केंद्र सरकारने आधिकचा 80 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रकल्प मार्गी लावल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले. ऑपरेशन ग्रीनची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. त्याचा फायदा फळ भाजा उत्पादक शेतकर्यांनी घ्यावा. तसेच पुरवठा साखळीला गतिमान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर तसेच अत्याधुनिक सामग्रीचा वापर शेतकर्यांनी करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.