Breaking News

कलम 370 रद्द करून काश्मिरात लष्कर वसवावे : डी. पी. वत्स


हरियाणातून नुकतेच राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेले भारतीय लष्कराचे माजी ले. जनरल डी. पी. वत्स यांनी काश्मीरमधून कलम 370 रद्द करावे. तसेच तेथे भारतीय लष्कर वसवावे, असे म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वत्स यांनी, कश्मिरातून कलम 370 हटवून तेथे कायमचे लष्कर तैनात करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर घाटीमध्ये होत असलेल्या पाकिस्तानच्या कारवाईसंदर्भात बोलताना, वत्स म्हणाले, की ’ज्या प्रकारे आपल्या देशात पाकिस्तानातून घुसखोरी होत आहे, त्याच पद्धतीने आपणही पाकिस्तानात घुसून त्यांना चोख उत्तर द्यायला हवे. एसेच एका पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, ’माझे आणि माझ्यासह निवडल्या गेलेल्या सदस्यांचे हे कर्तव्य आहे, की प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन देशाच्या विकासाला हातभार लावाला. वत्स यांनी भारतीय सेन्यात वरिष्ठ अधिकार्‍याच्या रुपात काम केले आहे. वत्स हे मुळचे हिसार येथील आहेत. त्यांना त्यांच्या कामगिरीच्या सन्मानार्थ सेना मेडल आणि विशेष सेवा मेडलने गौरवण्यात आले आहे.