Breaking News

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरी होणार्‍या शारीरिक, मानसिक जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मांदळी येथे घडली. याबाबत कर्जत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कर्जत मधील हरिदास जाधव यांची मुलगी पल्लवी हीचा विवाह मांदळी येथील अक्षय गांगर्डे यांच्याशी काही महिन्यांपूर्वीच झाला होता. परंतू मोबाईल शॉपी चालू करण्यासाठी माहेरावरून 5 लाख रु. आणावेत यासाठी अक्षय तिला वारंवार मारहाण करू लागला. पल्लवीची नणंद, सासू आदी तिला मानसिक, शारीरिक त्रास देत होत्या. या जाचाला कंटाळून पल्लवीने तिच्या राहत्या घरी 22 तारखेस विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारासाठी तिला पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. परंतू उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.

हरिदास जाधव यांनी पल्लवीचा पती अक्षय बापू गांगर्डे, सासरे बापू गांगर्डे, सासू रंजना गांगर्डे, ननंद सायली राजेंद्र घालमे यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.दीड वाजल्यापासुन फिर्याद देण्यासाठी मयताचे नातेवाईक पोलीस स्टेशनला बसून होते, पोलीसांची फिर्याद घेण्यासाठी टाळाटाळ होत होती. नातेवाईकांनी प्रेतासह पोलीस स्टेशनला ठिय्या दिल्याने पेलीसांनी ऊशीरा दाखल करून घेतली. नातेवाईकांनी आरोप केला की राजकीय दबावापोटी आरोपींना पळून जावू दिले. त्यामुळे नातेवाईक चिडले व आरोपींना अटक होत नाही तोपर्यत प्रेतावर अत्यसंस्कार केले जाणार नाहीत असे म्हणत मिरजगाव-राशीन मार्गावर रस्ता रोको केला.