जनसेवा फौंडेशन आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुक्यातील हळगांव येथे बुधवार दि. 28 मार्च रोजी सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दि. 28 रोजी दु. 4 वा. जामखेड येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील समृध्दी कॉम्प्लेक्स येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही संपन्न होणार आहे. हळगांव येथील श्री. भैरवनाथ विद्यालयाच्या प्रागंणात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी 9.30 वाजता पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते होणार असून, या उद्घाटन सोहळ्यास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जामखेड तालुक्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आरोग्याच्या तपासण्या करता याव्यात, असलेल्या आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात डोळ्यांचे विकार, अस्तीरोग, स्त्रीरोग, हृदय विकार, बालकांच्या विविध आजारांबाबत तपासण्या व उपचार केले जाणार आहेत. तालुक्यातील ग्रामस्थांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जनसेवा फाउंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
हळगाव येथे सर्वरोग शिबीराचे आयोजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:59
Rating: 5