Breaking News

बांधावरील पोल उपटून मारहाण; दोघांना अटक


येथील सतिष हरीभाऊ भोंगळे यांच्या शेतातील बांधावरील रोवलेले पोल उपटून त्यांना शिवीगाळ करून मारहाणकेल्याप्रकरणी राहाता पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली. अन्य आरोपी फरार आहेत. 


राहाता पोलीसात भोंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शेतामधील बांधावरील रोवलेले सिमेंटचे पोल आरोपी दत्तात्रय दगडू विधाटे, अनिकेत दत्तात्रय विधाटे, अभिजित हरीभाऊ विधाटे, मिननाथ माणकु गाडेकर, रंगनाथ गबाजी गाडेकर आणि अन्य लोकांनी उपटून शिवीगाळ व मारहाण केली. राहाता पोलीसांनी या सर्वांविरुद्ध {भा. दं. वि. कलम १४३, १४७, ४४७, ४२७, ३७९, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे} गुन्हा दाखल केला. दरम्यान याप्रकरणी दत्तात्रय विधाटे व अनिकेत विधाटे या दोघांना राहाता पोलीसांनी अटक केली. राहाता न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनवर सुटका करण्यात आली. अन्य आरोपी फरार आहेत.