Breaking News

अवैध वाळू वाहतुकीत जप्त वाहनांचा लिलाव


संगमनेर तालुका शहर परिसरातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतुक करतांना पुन्हा पकडल्या गेलेल्या वाहनांच्या मालकांनी बंधपत्राच्या रकमा भरल्या नाहीत. वाहनांचा लिलाव करुन पैसे वसूल करण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला आहे. प्रांताधिकारी भागवत डोईफाेडे यांनी यासंदर्भात तहसिलदारांना आदेश दिल्याची माहिती मिळाली. त्यामुळे संगमनेरमध्ये जवळपास ११ वाहनांचे लिलाव होणार आहेत.

विनापरवाना वाळू वाहतूक करतांना आढळलेली वाहने पकडून महसूलच्या पथकाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. दंडात्मक कारवाया करतांना या वाहनांच्या मालकांनी पुन्हा वाळू वाहतूक करणार नाही, अशा आशयाचे बंधपत्र प्रांताधिकाऱ्यांसमाेर करुन दिले आहे. मात्र या बंधपत्राचा विसर पडताच त्यांनी पुन्हा वाळू वाहतूक सुरु केल्याचे महसूल विभागने ही वाहने पकडल्यानंतर हे समोर आले. अशा १२ वाहनांवर प्रांताधिकारी त डोईफाेडे यांनी कारवाई प्रस्तावित केली. जवळपास ३२ लाख ४० हजार रुपये दंड वाहन मालकांवर होणार आहे. संबधितांनी पैसे न भरल्याने त्यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना दिले आहेत.