नवी मुंबई,अपहरण झालेली 14 वर्षीय मुलीची पोलिसांनी चौकशी केली असता, तिचे अपहरण झालेच नसल्याचे उघड झाले.रंगपंचमीची धामधूम सुरू असताना 14 वर्षीय मुलगी आपल्या भावाबरोबर मंदिरात गेली असताना ओमनी गाडी मधून आलेल्या तरुणांनी तिचे अपहरण केल्याची घटना समोर आली. ही घटना सायंकाळी शुक्रवारी सायंकाळी घडली. रंग लावलेल्या तरुणांनी हे अपहरण केल्याचे या मुलीच्या भावाने सांगितले.या घटनेचे पडसाद सोशल मीडिया मधून उमटले.परिणामी हजारो नागरिक पामबीच रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला.अपहरणकर्त्यांना लगेच शोधून काढावे या मागणीसाठी सुमारे अर्धा तास आंदोलन सुरू ठेवले.अखेर पोलिसांनी तातडीने कुमक तैनात करून मुलीचा शोध सुरू केला.या दरम्यान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आमदार मंदा म्हात्रे,नगरसेवक सोमनाथ वासकर, काँग्रेस नेते दशरथ भगत यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अपहरणकर्त्यांना अटक करण्यासाठी ठिय्या दिला. या दरम्यान वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांनी या मुलीला सानपाडा परिसरात अवघ्या काही तासात शोधून काढत सानपाडा पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर या अपहरणाची कथा उलगडली.या मुलीने आपल्या अपहरणाचा बनाव रचला होता.आईच्या धाकाने मुलीने हा बनाव रचला असल्याचे उघड झाले.काही दिवसापासून आई या मुलीला घराबाहेर जाऊ देत नसल्याने भावाबरोबर मंदिरात जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडून हा बनाव रचला.पोलिसांनी शोध घेवून देखील मुलीच्या भावाने वर्णन केलेली ओमनी गाडी संपूर्ण परिसरात आढळून आली नाही म्हणून पोलिसांचा संशय बळावला. मुलीच्या या बनावामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागल्याने या मुलीच्या पालकांवर चांगलाच संताप व्यक्त केला.मुलीचे वडील बाहेरगावी असल्याने पोलिसांनी जुजबी चौकशी करून घरी जाऊ दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
‘त्या’ मुलीचे अपहरण झालेच नाही !
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:15
Rating: 5