मांगेलीत 200 वर्षांनी गाव शिमगोत्सवासाठी एकवटला
सिंधुदुर्गनगरी - तब्बल दोनशेपेक्षा अधिक वर्षांनंतर मांगेलीत पूर्ण गाव एकत्र होऊन यावर्षी होळी सण साजरा करणार आहेत. सगळ्या वाड्या, सगळे मानकरी यांनी एकत्र येवून होळी साजरी केली. यापुढचे सगळे कार्यक्रम, न्हावण, रोंबाटही संपूर्ण गाव मिळून मिसळून सगळ्या वाड्यांवर होणार आहेत. मांगेलीची ही एकी अभूतपूर्व आणि अनेक गावांसाठी दिशादर्शक आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला मांगेली हा गाव. पायथ्याला सखल भागात कुसगेवाडी आणि देऊळवाडी तर उंच भागात तळेवाडी आणि फणसवाडी. गावात वाद अथवा तंटा नाही; पण शेकडो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या आपापल्या वाडीवर शिमगोत्सव साजरा करायचे. अगदी देवाचे न्हावणही तुळशीकडेच घेतले जायचे. कोकणातील परंपरेनुसार न्हावण गावातील घराघरात वाटले जाते. देवळातही असते. रोंबाटही घरोघरी नेले जाते; पण मांगेलीत मात्र वाड्यावाड्यांवर आणि काही घरांच्या समुहामध्ये शिमगोत्सव साजरा व्हायचा. जुन्या जाणत्या गावकर्यांच्या सांगण्यानुसार दोनशेपेक्षाही अधिक वर्षांनी प्रथमच सगळ्या वाड्या, सगळे मानकरी एकत्र येऊन यावर्षी एकोप्याने शिमगोत्सव साजरा करत आहेत. जवळपास अकरा मानकरी आणि एक त्रयस्थ मानकरी असे बारा जण एकत्र येवून यावर्षीचा शिमगोत्सव साजरा करणार आहेत. त्या सर्वांनी एकत्र येत होळी साजरी केली. गावात सर्वांनी मिळून जवळपास आठ ठिकाणी होळ्या उभारल्या आहेत. शिवाय न्हावणाचा कार्यक्रमही संपूर्ण गाव मिळून करणार आहे.