पैसे मागायला गेलेल्या शेतकर्याची हत्या
विकलेल्या गाईचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या शेतक-याला रॉकेल ओतून पेटवून दिले असल्याची घटना पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे घडली. अश्रुबा दश्रथ नागरगोजे असे शेतक-याचे नाव आहे. या घटनेनंतर त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अश्रुबा हे 80 टक्के भाजले होते असे डॉक्टरांनी सांगितले.
दुष्काळामुळे गाईची परवड होऊ नये म्हणून शेतकर्याने गावातीलच एका दूध संकलन केंद्राच्या चेअरमनला 40 हजार रुपयांना गाय विकून टाकली. मात्र, पैसे मागण्यासाठी गेलेल्या शेतकर्याला पैसे देण्याएवजी चक्क पेटवून देण्यात आले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर मी माझी गाय पुन्हा घेवून जाईन असे अश्रुबा यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्यात खरेदीदाराबरोबर वाद झाले. यावेळी यावरूनच खरेदीदार आणि इतर तिघांनी अश्रुबा यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. यात आश्रुबा गंभीररित्या जखमी झाला.