देवेंद्र झाझरियाला राजस्थान सरकारकडून 75 लाखांचे बक्षीस
जयपूर, दि. 16 - रियो पॅरालिंपिक 2016 मधील भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करणा-या देवेंद्र झाझरियाला राजस्थान सरकारने 75 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात राहणा-या झाझरियाने रियो पॅरालिंपिक स्पर्धेत स्वत:च्याच नावावर असलेला विश्वविक्रम मोडून दुस-यांदा सुवर्ण पदकाची कमाई केली. या निमित्ताने राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी ट्विटरवरून झाझरियाचे अभिनंदन केले. वसुंधरा राजे यांनी म्हटले की, पॅरालिंपिक स्पर्धेत दोन सुवर्ण पदके पटकावून देशातील पहिला पॅरा-थलिट बनला आहे. तुझ्या यशाबद्दल राजस्थान सरकारला अभिमान आहे. देवेंद्रने देशाची प्रतिमा आणखी उजळली आहे.
राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, 75 लाख रुपयांच्या बक्षिसासह जयपूरमध्ये राहण्यासाठी जमीन व श्री गंगानगर जिल्ह्यात शेत जमीनही दिली जाऊ शकते.