Breaking News

ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचे निधन


मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असल्याची माहिती डिझायनर संदीप खोसला यांनी सोशल मिडीयाद्वारे दिली. त्या 89 वर्षांच्या होत्या. शम्मी यांच्या निधनाची माहिती मिळताच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शम्मी यांचा जन्म 1931 साली मुंबईत झाला होता. त्यांचे मुळ नाव न र्गिस राबडी असे होते. दिग्दर्शक तारा हरिश यांनी त्यांचे नाव बदलून शम्मी असे ठेवले होते.