पीएनबी घोटाळा : चंदा कोचर, शीखा शर्मा यांना नोटीस
मुंबई : पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर आणि एक्सिस बँकेच्या अध्यक्षा शीखा शर्मा या दोघींनाही तपास यंत्रणांनी नोटिस बजावली आहे. स्पेशल फ्रॉड इन्वेस्टिगेशन कार्यालयाने दोघींनाही 10 दिवसांपूर्वी नोटिस बजावली असून दोघींचीही आज चौकशी होणार होती. मात्र काही खासगी कारणांमुळे कोचर आणि शर्मा या दोघीही गैरहजर होत्या. तसेच त्यांनी हजर राहण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी मागितला आहे. पतहमीच्या म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या जोरावर नीरव मोदी आ णि मेहुल चोकसी यांनी त्यांच्या नावावरील डायमंड आरएस, सोलर एक्सपोर्ट, स्टेलर डायमंडस या तीन कंपन्यांसाठी हाँगकाँगमधील अलाहाबाद बँक, अॅक्सिस बँकेतून पैसे मिळवले.