Breaking News

सभापती गडाख यांच्या हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ


नेवासा तालुक्यातील माका येथे सभापती सुनीता गडाख यांचा हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या साविता अडसुरे होत्या. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, सरपंच नाथाजी घुले, शैलाताई घुले, प्राचार्य स्वरुपचंद गायकवाड, लता गुलगे, वैशाली एडके, सुनिता भराडे, अनिल अडसुरे उपस्थित होते. 

यावेळी माका ते हाडोळा रस्ता ( दलित वस्ती ), गावांतर्गत भूमिगत गटारे, कोकाटे वस्ती शाळेसाठी संरक्षक भिंत यासह विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सभापती गडाख यांनी गडाख घराण्याचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करताना विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. तसेच आम्ही केवळ राजकारण न करता सदैव जनतेसोबत राहू अशी ग्वाही दिली.