Breaking News

स्माईल प्लस सोशल फाउंडेशनला युवकांकडून आर्थिक मदत


नेवासाफाटा/ प्रतिनिधी/ - मनोरुग्णांची सेवा करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपूर येथील स्माईल प्लस सोशल फाउंडेशनला नेवासाफाटा येथील युवा सचिनभाऊ संभाजी पठाडे यांनी पाच हजाराची आर्थीक मदत देऊन फाउंडेशनच्या पवित्र कार्याला हातभार लावला आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांना शोधून काढून त्यांची कटिंग,दाढी करणे,नवीन कपडे परिधान करणे अशी कामे फाउंडेशन करते मनोरुग्णास पुढील उपचार करून तो वेडा म्हणून नाही तर माणूस म्हणून जगेल. असे स्माईल प्लस फाउंडेशन कार्य आहे. सध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेशदादा मालखरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर कार्य सुरू आहे. 

नेवासाफाटा येथून सोमवारी सायंकाळी योगेश दादा मालखरे हे नागपूरला जात असतांना त्यांची नजर पेट्रोल पंपाजवळ फिरणाऱ्या एका मनोरुग्णावर गेली. बाळू नामक अंदाजे पंचेचाळीस वर्षीय या व्यक्तीला त्यांनी गाठले. त्यानंतर त्याची कटिंग करून अनेक वर्षांपासून असलेल्या डोक्यावरील वाढलेल्या जटा त्यांनी दूर केल्या. त्याची दाढी केली पूर्ण चेहरा चकाचक झाल्यानंतर त्यांनी त्याला नवीन कपडे परिधान केले. फाउंडेशनचे हे काम पाहून जेष्ठ नेते भाऊसाहेब पटारे यांनी व काँग्रेस कमिटीचे तालुका सचिव संदीपबाबा क्षीरसागर, मराठा सेवा संघाचे गणेश झगरे यांनी या पवित्र कार्याचे कौतुक करून योगेशभाऊ मालखरे यांना धन्यवाद दिले. यावेळी पत्रकार प्रा.सुनील गर्जे, पत्रकार सुधीर चव्हाण, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रतापभाऊ हांडे, सुरजभाऊ नागंरे,सचिन पठाडे,संदीप भूमकर,दादा निपुंगे,आकाश कडु, महेश गरूटे जितेंद्र ढोकणे, राहुल बंदिवान,संतोष निंपुगे, नीरज नांगरे,दिपक एरंडे, सचिन गायकवाड व प्रतापराजे हांडे मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.