Breaking News

भर उन्हाळ्यात महाबळेश्‍वरला कडाक्याची थंडी

सातारा : राज्यात अंगाची लाही लाही करणारे कडाक्याचे उन्ह असताना महाबळेश्‍वरला मात्र कडाक्याची थंडी पडली आहे. येथील लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा 3 अंशावर पोहोचला आहे. राज्यात सध्या कडाक्याचे उन्ह आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असताना महाबळेश्‍वरला मात्र कडाक्याची थंडी पडली आहे. अचानक झालेल्या हवामान बदलामुळे महाबळेश्‍वरमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचे सांगण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या शेवटी प्रथमच तापमानाचा पारा इतका खाली घसरला आहे. सकाळी माळरानावर बर्फाची चादर पसरलेली पाहायला मिळाली. तर वाहनांवर देखील बर्फ साचलेला मिळाला.