Breaking News

फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटात 5 ठार

नालंदा : बिहारच्या नालंदा जिल्ह्यात अवैधरित्या उभारण्यात आलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 जण ठार तर 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ज्या जखमींची प्रकृती गंभीर आहे त्यांना पुढील उपचारांसाठी पाटणाला हलवण्यात आले आहे.या स्फोटाची तिव्रता एवढी भयंकर होती की आजूबाजूच्या घरांचे यामुळे नुकसान झाले. आग्नीशामक दलाने लगेचच घटनास्थळी येऊन आग विझवण्यासाठी दाखल झाली. मदत आणि बचाव कार्य चालू असून पोलिसांचा तपास चालू आहे.