Breaking News

जळगाव जिल्ह्यात कुक्कुट पक्षी संगोपनासाठी साडेआठ लाख रुपयांचे वाटप


जळगाव, दि. 27, मार्च - नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील सात लाभार्थ्यांना सन 2017-18 या वर्षात 1 हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपन योजने अंतर्गत 8 लाख 43 हजार 750 रुपयांच्या धनादेशाचे वाटप सोमवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. एक हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपन योजने अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती,जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. या योजनेतून खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रति युनिट 2 लाख 25 हजार प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 1 लाख 12 हजार 500 तर अनूसूचित जाती/जमातीच्या लाभार्थीना प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के म्हणजेच 1 लाख 68 हजार 750 या मर्यादेपर्यत शासकीय अनुदान देण्यात येते. सन 2017-2018 या वर्षात नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत जिल्ह्यातील सात लाभार्थ्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार 1 हजार मासंल कुक्कुट पक्षी संगोपन यासाठी पक्षीगृहाचे बांधकाम 40 दिवसांचे आत केलेले आहे. अशा लाभार्थ्यांना शासकीय अनुदानाचा देय आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीने निवड केलेल्या सात लाभार्थ्यांना शासकीय अनुदानाच्या धनादेशाचे वाटप आज जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एस.जे.गायकवाड, जिल्हा प रिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पी. एस.इंगळे, सात तालुक्यांचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रकाश बाबुराव पाटील, रा.भोरटेक, ता.भडगांव, प्रविण प्रकाश पाटील, रा.म्हसावद, ता.जळगांव, शेंवताबाई आनंदा पाटील, निमखेडी, ता.मुक्ताईनगर, सुरेश बाबुराव पाटील, रा.सारवे, ता.धरणगांव, गुलाबसिंग चंद्रसिंग पाटील, रा.जळू, ता.एरंडोल, संगिता राजेंद्र बारी, रा.शेंदूर्णी, ता.जामनेर यांना प्रत्येकी 1 लाख 12 हजार 500 रुपयांचा तर संगिता तुकाराम अढांगळे, रा. विटवा, ता. रावेर यांना अनुसू चित जाती प्रवर्गातून 1 लाख 68 हजार 750 रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.