सिंधुदुर्गनगरी, दि. 27, मार्च - देवगड तालुक्यातल्या पावणाई गावाने यावर्षीचा तालुकास्तरिय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकावला असून आता जिल्ह्यातही आपला करिष्मा कायम राखण्यासाठी हे गाव सज्ज झाले आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय समितीने ग्रामपंचायत पावणाई येथे भेट देऊन कामांचे मुल्यमापन केले. यावेळी पावणाई गावाने राबवलेल्या उपक्रमांचे समितीने कौतुक केले. यावेळी पावणाई गावाने मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या 10 बचत गटांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पावणाई शाळा नं 1 च्या विद्यार्थ्यानी स्वच्छतेबाबत तसेच महिलांचे आरोग्य आणि महिलांच मासिक पाळी व्यवस्थापन याबाबत पथनाट्य सादर के ले. या पथनाट्याला सर्वानी टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी खडज प्राप्त प्रमाणपत्राच वितरण पावणाई गावाला मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल. यानंतर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राबवलेले उपक्रम चित्रफित दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला दहा बचत गटातील महिला गट, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी से विका, पंचायत समिती देवगड येथील तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, बीआसी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या नंतर मुल्यमापन समितीने गावात प्रत्यक्ष कुं टूब भेटी देऊन वैयक्तिक शौचालये, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी तसेच सार्वजनिक पाण्याचे व्यवस्थापक याबाबत पाहणी केली.