Breaking News

प्रसादासाठी लागणाऱ्या साहित्यावरील जीएसटी हटवा.


नवी दिल्ली : पंजाबच्या सुवर्ण मंदिर, दुर्गियाना मंदिर व रामतीर्थ मंदिरात लंगर व प्रसादासाठी लागणाऱ्या साहित्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी शुक्रवारी काँग्रेसचे खा. प्रताप सिंग बाजवा यांनी एका पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे केली. बुधवारी पंजाब सरकारने लंगर व प्रसादाच्या साहित्यावरील राज्य सरकारच्या वाट्याचा जीएसटी रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता केंद्राने आपला जीएसटी रद्द करावा, अशी मागणी बाजवा यांनी मोदींकडे केली आहे. .