Breaking News

गोवंश कत्‍तल प्रकरणी ४ आरोपींना अटक; आरोपींची झाली संख्या १८


शहरातील बेकायदा गोवंश कत्‍तल प्रकरणात मंगळवारी {दि. १३} पोलिसांनी आणखी ४ फरार आरोपींना अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात शहर पोलीसांनी एकूण १८ आरोपींना ताब्‍यात घेतले आहे. या ४ आरोपींना न्‍यायालयात हजर करण्यात आले. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. 

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना शहरात राजरोसपणे अनधिकृतपणे कत्तलखाने सुरू आहेत. अशी गुप्त खबर मिळताच मंगळवारी {दि. १३} सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहर पोलिसांसमवेत कारवाई केली. यावेळी संजयनगर व आयेशा कॉलनी भागात छापे टाकले. या कारवाईत सुमारे ८९ लाख रुपये किंमतीचे १९ हजार ५०० किलो गोमांस, ३३७ जीवंत गोवंश जनावरे, कातडी, चरबी, तूप व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी ११ जणांविरूध्द महाराष्ट्र गोहत्या प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही झाली. मात्र काही आरोपी फरार झाले होते. 

या गुन्‍हयात सलीम नजीर पिंजारी, रा. इंदिरानगर, रफिक युसूफभाई कुरेशी, रा. मुंबई, {हल्ली मुक्काम संजयनगर}, इरफान कुरेशी २४, संजयनगर, सत्‍तार निसार कुरेशी, {रा. सुभाषनगर} यांचा यात समावेश आहे.