Breaking News

जि. प. शाळांना बजाज यांचेकडून फर्निचर भेट


कर्जत तालुक्यातील कुळधरण, कोपर्डी, सुपेकरवाडी, धालवडी, तळवडी, हरणवाडी, थोरात या वस्ती जिल्हा परिषदेच्या शाळांना राशिनच्या वासुदेव फर्निचरचे मालक, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मेघराज बजाज यांच्या वतीने फर्निचर भेट देण्यात आले. टेबल, कपाट, खुर्च्या, चप्पलस्टँड अशी भेट शाळांना देण्यात आली.
कुळधरण येथे शाळेच्या वतीने मेघराज बजाज यांचा सत्कार करण्यात आला. शाळा व ग्रामस्थांच्या वतीने कुळधरण ग्रामविकास संघटनेचे शेषेराव सुपेकर यांच्या हस्ते मेघराज बजाज यांचा सत्कार करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन जगताप, मुख्याध्यापक कैलास गलांडे, शारदा शेळके, शितल खराडे, शितल खलाटे, शैला मराळे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन शितल खराडे यांनी केले. कैलास गलांडे यांनी आभार मानले. वासुदेव फर्निचरच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आले. कोपर्डीत माजी सरपंच सतिश सुद्रिक, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र सुद्रिक, हरणवाडीचे संतोष कानडे, आबासाहेब गांगर्डे, भाऊसाहेब सुद्रिक, ज्ञानदेव सुद्रिक यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळांच्या वतीने मेघराज बजाज यांचा सन्मान करण्यात आला.