Breaking News

केंद्रसरकार विरोधात अण्णा हजारे यांचा पुन्हा एल्गार

राळेगणसिद्धी :  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. जंतरमंतरवर 23 मार्चपासून आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आली नाही. परदेश दौऱयावर व्यस्त असल्यामुळे मोदींना वेळ नाही, अशी टीका यावेळी अण्णा हजारेंनी के ली. आम्ही लोकांसाठी आंदोलन करत आहोत. हार्ट अटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणे अधिक चांगले, म्हणून उपोषण करणारच, असा निर्धार अण्णा हजारे यांनी केला आहे. लोकपालची अंमलबजावणी आणि शेतकऱयाच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आहे, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.यावेळी आंदोलनात सहभागी होणाऱयांकडून राजकारणात जाणार नाही, अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहोत. याअगोदरची ‘टीम अण्णा फुटली’ किंवा ती फोडण्यात आली. ती फुटली नसती तर देशाचे वेगळेच राहिले असंते. टीम अण्णा फुटल्यामुळे देशाचे नुकसान झाले. अशी खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.