Breaking News

रुई येथे हनुमान दैवाचा यात्रोत्सवाचे आयोजन


शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डी लगत असलेल्या रुई येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमानजन्मानिमित्त शनिवारी {दि.३१} जंगी यात्रोत्सव होणार आहे. यानिमित्त पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत काकडा भजन, अभिषेक पूजा, सामुदायिक हनुमान चालीसा पठण, सत्यनारायण महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, सकाळी ९ ते १२ मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती रुई गावचे सरपंच संदीप वाबळे यांनी दिली. 

रुई गावातून महिला डोक्यावर कळस घेऊन मिरवणूक काढणार असून यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. रविवार {दि. १} सकाळी १० ते १२ या वेळेत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. तर २ एप्रिल रोजी ९ ते १२ यावेळेत मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहून मोठ्या भाविकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय हनुमान तरुण मंडळ व रुई ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.