Breaking News

आश्वी खुर्द शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


तालुक्यातील आश्वी खुर्द येथे जिल्हापरिषद शाळेने आयोजित केलेले वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. उपस्थित मान्यंवरानी शाळेच्या गुणवत्तेबाबत चिमुकल्यांचे कौतूक तर शाळेला ‘ अ ’ श्रेणी मिळाल्याबदल अभिनंदन केले आहे. अध्यक्षस्थानी माजी जिल्हापरिषद सदस्य अण्णासाहेब भोसले होते. 

यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय उजे, सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनिल मांढरे, पोलिस पाटील बापुसाहेब गायकवाड, काशिनाथ गायकवाड, मेजर सतिष घुगे, केद्रंप्रमुख वाघ, मनिषा लुणिया, डॉ. दिपाली गायकवाड आदिसह सर्व ग्रामपंचायत सदंस्य, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रंसगी विद्यार्थ्यानी विविध सास्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. मुख्याध्यापक डी. के. मुढें यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन के. एस. सहाणे व एन. टी. कांबळे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक गोसावी, मुढें, सातपुते, श्रीमती घुले, श्रीमती नजन आदींनी विशेष परिश्रम घेतले.