Breaking News

अनधिकृत बांधकामांना करात सूट द्या


संगमनेर नगरपरिषद हद्दीतील एकूण ३ हजार १६० अनधिकृत बांधकामे आहेत. या बांधकामांना मालमत्ता करात अतिरिक्त दंड न आकारात त्यांना करात सूट द्यावी आणि बांधकाम नियमित करावे, अशी मागणी शहर भाजपने संगमनेर नगरपरिषद प्रशासनाकडे केली. 

यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राजेंद्र सांगळे, राम जाजू, दिनेश सोमाणी, श्रीगोपाल पडतानी, सीताराम मोहरीकर, राधावल्लभ कासट, शिरीष मुळे, श्रीराम गणपुले, शोभा परदेशी, मेघा भगत आदी उपस्थित होते.