Breaking News

तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड

भाजपाचे चिटणीस एच. राजा आणि भाजयुमो तमिळनाडू शाखेचे प्रमुख एस.जी. सूर्या यांनी लेनिनचा पुतळा पाडण्याचे स्वागत करताना, तामिळनाडूतील थोर समाजसुधारक ई.व्ही. रामस्वामी पेरियार यांचा ‘जातीय राजकारणाचे शिरोमणी’ असा उल्लेख करून त्यांचेही पुतळे पाडले जायला हवेत, असे सूचित केल्यानंतर काही तासांतच वेल्लूर येथील पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे.