Breaking News

औरंगाबादमध्ये कचराप्रश्‍न ‘पेटला’आंदोलनाला हिंसक वळण; दगडफेकीत 9 पोलीस जखमी

औरंगाबाद : औरंगाबाद येथील कचरा प्रश्‍नांने पेट घेतला असून बुधवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मिटमिटा आणि पडेगावांमध्ये कचर्‍याच्या गाड्यांवर स्थानिकांनी तुफान दगडफेक केली. तसेच दोन गाड्यांची तोडफोड केली तर काही गाड्या पेटवून दिल्या आहेत. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यामुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. या दगडफेकीत 9 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर प रिसरात सुमारे 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. शहरात साचणारा तब्बल 611 टन कचरा उचलून तो कांचनवाडी, मिटमिटा भागात टाकण्यात होता. मिटमिटा येथील ग्रामस्थांचाही कचरा टाकण्यास विरोध दर्शवला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देखील मिटमिटा येथे कचरा टाकण्यासाठी आलेल्या सात-आठ वाहनांपैकी एक गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला होता. तर पैठण रोडवरील कांचनवाडीजवळ एसटीसह काही वाहनांवर दगडफेक झाली.शहरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेश सुरुच असून 25 ते 30 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रणासाठी 3 डीसीपी, 6 एसीपी, 15 पीआय, 18 एपीआय तसेच 100 जवानांची एसआरपीची तुकडी, आरसीपीच्या 3 प्लाटूनही तैनात करण्यात आल्या आहेत. विविध पोलिस स्थानकांमधील आणि मुख्यालयातील 135 पोलीस कर्मचारी, क्युआरटीचे 12 जवान आणि 30 महिला पोलिसांची तुकडी देखील बंदोबस्तात आहेत. गेल्या 20 दिवसांपासून औरंगाबादमध्ये कचरा कोंडी सुरु आहे, शेवटी बुधवारी या आंदोलनाने पेट घेतला.