विदर्भात बोंड अळीमुळे शेतकर्यांना इन्फेक्शन
अमरावती : विदर्भातल्या कापूस उत्पादकांसमोरची संकट दिवसेंदिवस वाढत चालली. बोंडअळीने राज्यातला 45 टक्क्यांपेक्षा जास्त कापूस फस्त केल्यानंतर, आता बोंड अळीमुळे कापूस हाताळणार्या शेतकर्यांना इन्फेक्शन होत असल्याची नवी बाब पुढे आली. यामुळे कापूस उत्पादक आणि मजूर पुरते धास्तावलेत. विदर्भ आणि राज्यातल्या कापूस शेतीला यंदा बोंडअळीने चकवा दिला. राज्यातले अंदाजे 45 टक्क्यांपेक्षा जास्त कापसाचे पिक बोंड अळीने फस्त केले. कापूस उत्पादकांना पुरते जेरीस आणलेल्या या अळीचा आता नवा त्रास सुरु झालाय. शेवटच्या टप्प्यातला कापूस वेचणार्यांना, कापूस साठवणार्यांना म्हणजे कापूस हाताळणार्यांना त्वचेचे विकार जडत असल्याची बाब समोर येत आहे. अमरावती जवळच्या पिंपळखुटा गावातले शेतकरी या त्रासानं पुरते हैराण झाले.