शिवसेना आणि शेतकरी सेना कार्यकारिणी जाहीर
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, खा. सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार कोपरगाव तालूका शिवसेना व शेतकरी सेना पदाधिका-यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली, अशी माहिती कोपरगाव तालूका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली.
या कार्यकारिणीमध्ये उपतालुकाप्रमुख सुरेश गिरे, रंगनाथ गव्हाणे, प्रविण शिंदे, राजेंद्र नाजगड, अशोक मुरडणर, संघटक रावसाहेब थोरात आदींसह शेतकरी सेना संघटक प्रविण शिंदे, सहसंघटक मिननाथ जोंधळे, सिताराम तिपायले, महेंद्र देवकर, जालिंदर कांडेकर, रविंद्र जेजुरकर, गंगाधर रहाणे, नानाभाऊ डोंगरे, आदींसह तालुक्यांचे गट आणि गण प्रमुखांचा समावेश आहे.