Breaking News

सात्रळसह परिसरात खुरकूत रोगाचे थैमान


राहुरी तालुक्यातील सात्रळ, सोनगाव आदी गावांमध्ये खुरकूत रोगाची लागण झाली असल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग, दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत.खूरकुत रोगाची परिसरात लागण झाल्यामुळे शेतकरी व दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. खूरकुत सारख्या रोगाची लागण झाल्यामुळे शेतकरी वर्गाकडुन नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र परिसरातुन दिसत आहे.गाईची चारा खाण्याची क्षमता कमी होऊन अशक्तपणा जाणवतो. कारण लाळ खुरकूतचे जंतु हवेतून पसरतात.दुसरे असे की लस म्हणजेच तो आजार निर्माण करणारे जंतुच असतात. पण त्यांची शक्ती कमी केलेली असते.लस दिल्यावर शरीरात त्या आजारविरुद्ध प्रतिपिंडे तयार होतात, त्यामुळे रोग जंतुचा हल्ला झाल्यावर शरीर त्या रोगास बळी पडत नाही. यासाठी किमान 21 दिवस लागतात.ज्यावेळेस जनावरे संक्रमण काळात असतात, लस दिल्याने आजार निर्माण होण्याची शक्यता वाढते. कारण लस दिल्याने शरीरावर ताण येतो. जंतु अशा वेळी प्रबळ ठरतात. म्हणून आसपास लाळ खुरकुत रोगाची साथ असल्यास लसीकरण करू नये. अशी वेगवेगळ्या चर्चचे विषय परिसरातील शेतकरी करताना दिसत आहे.