Breaking News

महाराष्ट्रच्या भुमीत महिला सुरक्षित नाही: कु. प्रतिक्षा कोरगांवकर

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे जय हरी महिला प्रतिष्ठान द्वारा महिला दिनानिमित्त महिला मेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर सुमन काळे, सविता उंदरे, निता वाघ, निर्मिली सांगळे, मंगला म्हस्के, भारती नगरे, अनिता भगत, संगीता वाडकर ह्या यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

प्रतिक्षा कोरगांवकर पुढे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्रच्या भुमीत कोणत्याच क्षेत्रातील माहिला सुरक्षित नाही. महिलांनी स्वताचे संरक्षण करता आले पाहिजे. राजमाता जिजाऊ सारखे मुलांना आजची आई शिकवत नाही. राजमाता जिजाऊ सारखे महिला घराघरात असली, तर अत्याचार होणार नाही. आज भारतमाता पण सुरक्षित नाही. गोमाता ही असुरक्षित आहे. पुर्वीच्या काळात आत्महत्या होत नव्हत्या. महिला संरक्षण करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आणि उदाहरणे सांगण्यात आले मनात शॉर्या असेल पाहिजे. तेव्हा कोणीही वाईट नजरेने बघणार नाही. शक्ती आणि भक्ती आपल्यात असली पाहिजे. भारतमातेचा अभिमान असेल तर, इंग्रजी संस्कृती का? आपण साकार करत आहे. रणरागिणी सारख आपण जगले पाहिजे.