Breaking News

चांदा येथील जि.प.प्रा.शाळेत जागतिक महिला दिन साजरा


चांदा /प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील चांदा येथील जि. प. प्रा.शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा केला .यावेळी प्रथम वंदना शहा ने यांनी महिलादिनाचे महत्व उपस्थित महिला व मुलींना पटवून दिले. तसेच वर्षा शिंदे यांनी आपण जागतिक महिला दिन साजरा का करतो. त्याविषयी माहिती दिली. मासाहेब जिजाऊ , झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर आदी थोर महिलांनी केलेल्या कार्याची यावेळी माहिती दिली. .उषा मोरे यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी ज्ञानेश्वरी दळवी , रुपाली खेडकर , अनिता जाधव, वर्षा शिंदे, वंदना शहाने , उषा मोरे , या शिक्षिका व वावरे , वाघमारे व महिला , विद्यार्थिनी उपस्थित होत्या.