Breaking News

दखल - आमदारांच्या मुक्ताफळांची मांदियाळी

सत्ता डोक्यात गेली, काय होतं, हे भाजपच्या नेत्यांच्या मुक्ताफळांमुळं कळतं. सत्ता विनयानं शोभते, असं म्हणतात; परंतु ज्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष दानवांची भाषा वापरतो, त्या पक्षाचे नेते तरी मग कशाला माज करण्यात मागं राहतील? रावसाहेब दानवे जिथं शेतकर्‍यांना साले म्हणतात, तिथं भाजपच्या मुंबईच्या आमदारानं एका अधिकार्‍याला शिव्या दिल्या, तर या पक्षाची ही नवी संस्कृती आहे, म्हणून सोडून द्यायचं. ज्या पक्षानं कायम संस्कृतीचा जप करायचा, त्या पक्षाचे नेते अशी संस्कृती पायदळी तुडविणारी भाषा वापरत असतील, तर तो त्या नेत्यांचा दोष नाही, तर पक्षाच्या संस्कृतीचा दोष आहे, असं म्हणावं लागेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडचं गृहखातं असल्यानं आपण काहीही केलं, कसंही वागलो, तरी आपल्याला कुणीही काही करू शकत नाही, ही माजोरी वृत्ती भाजपच्या नेत्यांमध्ये आली आहे. काही नेत्यांनी तर यापूर्वी आपली हातसफाई करून घेतली आहे. ज्यांचे हात मारहाणीसाठी कायम शिवशिवत असतात, त्यांनी केवळ शिव्या दिल्या, तर आकांडतांडव कशासाठी करायचं!
मुंबईत भाजपचे आमदार अमित साटम यांनी पोलिसांना दमदाटी केल्याचा आणि फेरीवाल्यांना शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नागपुरातील भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पोलिसांना खुलेआम शिवीगाळ केली आहे. वैयक्तिक कारणावरून तिवारींनी गणेशपेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांना शिवीगाळ केली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या शहरात भाजप नेत्याची सत्तेची मस्ती दाखवणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काहीच कारवाई केली नाही. गेल्या काही दिवसात भाजप नेत्यांना सत्तेचा माज आला आहे, हे दाखवणारे एकापाठोपाठ एक प्रकार समोर येत आहेत. कुठं पोलिसांना शिवीगाळ केली जात आहे, कुठं कंत्राटदारांना धमकावलं जात आहे तर कुठं म हिलांशी असभ्य भाषेत बोललं जातंय. विशेष म्हणजे त्यात महिला नेत्याही मागं नाहीत. महिला नेत्यांच्या तोंडची भाषाही उल्लेख न करता येण्यासारखी आहे. अधिकार्‍यांनी लोक प्रतिनिधींशी कसं वागावं, हे सांगण्यासाठी राजशिष्टाचार आहे. अधिकार्‍यांना त्याबाबत वारंवार सांगितलं जातं. आमदाराचं काम असलं, तर अधिकारी शक्यतो टाळत नाही. तीच बाब फोनची. एखाद्या वेळी अन्य कामात असेल, तर आमदारांचा फोन घ्यायचं टाळलं जातं. जर समजा एखाद्या अधिकार्‍यानं फोन घेतला नाही, तर त्याबाबतची तक्रार त्यांच्या व रिष्ठांकडं करता येईल. कायदा हातात घेणं, अश्‍लील भाषेत शिवीगाळ करणं हा त्यावरचा उपाय नाही. साटम यांनी जरी हा आवाज आपला नाही, असं म्हटलं असलं, तरी सुरुवातीचं संभाषण आपलंच आहे, असं मान्य केलं आहे. गैरव्यवहार बाहेर काढला, म्हणून मला गोवलं, या आरोपात तथ्य दिसत नाही. पूर्वी याच साटम यांनी फेरीवाल्यांवरील क ारवाईचं निमित्त करून पोलिसांना दमदाटी तर केलीच पण पोलिसांच्या समोर फेरीवाल्यांना शिवीगाळ केली आहे. साटम यांच्यावर या प्रकरणात कुठलीही कारवाई झालेली नाही. म्हणजे साटम यांच्या तोंडची आताची शिवराळ भाषा सरावलेली आहे.
साटम यांच्या प्रकरणापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे आमदार राजू तोडसाम यांची ठेकेदाराला धमकावणारी ऑडिओ क्लिप समोर आली होती. माझ्या भागात काम कारायचे असेल तर माझा हिस्सा द्यावा लागेल, अशी धमकी तोडसामांनी शर्मा नावाच्या ठेकेदाराला दिल्याचं समोर आलं होतं. तुला हवं तर मुख्यमंत्र्यांकडं जाऊन माझी तक्रार कर असंही या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं होतं. स्वच्छ चारित्र्य, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि पारदर्शकता ती हीच का? रामटेकचे भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावरही महिलांसोबत असभ्य वर्तनाचा आरोप आहे. निवेदन देण्यासाठी आलेल्या महिलांशी रेड्डी असभ्य वागल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली, मात्र कारवाई काही झालेली नाही. भाजप नेत्यांना सत्तेचा माज आला असून हा माज दिवसेंदिवस वाढत चालल्याचा या घटनांमधून स्पष्ट होत आहे. पारदर्शक कारभाराचा ढोल बडवणारे मुख्यमंत्री या प्रकरणांमध्ये हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन असल्यानंच हा या माजावर नियंत्रण येत नसावं. साटम यांनी मुंबई महापालिकेच्या एका अभियंत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. के-पश्‍चिम वॉर्डमधील कनि. अभियंता राठोड आणि सहायक अभियंता पवार यांना साटम यांनी शिवीगाळ करत धमकावल्याचा हा ऑडिओ आहे. साटम हे अंधेरी पश्‍चिम भागातील आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वी साटम यांनी फेरीवाल्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाल्यानं वाद निर्माण झाला होता. आता, पालिका अधिकार्‍यांना शिवीगाळ करत धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. साटम यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावत सदर क्लिपच बनावट असल्याचा दावा केला आहे. फोन संभाषणातील सुरुवातीचा आवाज आपला असला, तरी शिवीगाळ ऐकू येत असलेला संभाषणाचा भाग एडिट किंवा मॉर्फ करून व्हायरल केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे.
पवार वेस्ट वॉर्ड सोडून 10 महिने झाले, म्हणजे हे संभाषण किमान एक वर्ष जुनं असावं. अशा प्रकारचे कोणतंही संभाषण झाल्याचं आपल्या आठवणीत नाही. अभियंते पवार यांच्याशी आपले चांगले संबंध होते, त्यामुळं त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रश्‍नच येत नाही, अशी सारवासारवी आता साटम यांनी केली आहे. विधानसभेत 50 हजार कोटींचा बि ल्डिंग स्कॅम बाहेर काढला होता. त्याबाबत चौकशी सुरू असून लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निर्णय होण्याआधी माझी बदनामी करून दबाव आणण्याचा के विलवाणा प्रयत्न सुरू आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. झारखंडमधील एका भाजप नेत्याने परिवहन विभागाच्या एका अधिकार्‍याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मी डियावर व्हायरल झाला आहे. या नेत्याच्या चार चाकी वाहनावरील नेमप्लेट काढण्यासाठी हा अधिकारी गेला होता. त्याचवेळी या भाजप नेत्यानं शिवीगाळ करत त्या अधिक ार्‍याला मारहाण केली. हा व्हिडिओ झारखंडमधील लातेहर जिल्ह्यातील असल्याचं समजतं. सरकारी आदेशानुसार काल परिवहन अधिकारी एफ. बारला हे भाजप नेते राजधानी यादव यांच्या पोलीस अधीक्षक कार्यालयानजीक उभ्या असलेल्या वाहनावरील नेमप्लेट काढण्यासाठी गेले होते. बारला हे कर्मचार्‍याकडून ती नेमप्लेट काढून घेत असल्याचं व्हि डिओत दिसतं. त्याचवेळी यादव हे पळत-पळत आले आणि त्यांनी थेट बारला यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. कोणाच्या आदेशानं ही नेमप्लेट काढत आहे, असा जाब यादव हे बारला यांना विचारत होते. त्यांनी बारला यांच्या तोंडावर ठोसे लगावल्याचं व्हिडिओत दिसतं.