Breaking News

आ. साटम यांच्या व्हायरल वाणीतून निपजला सत्तेचा माज कार्यकारी अभियंत्यांना अश्‍लाघ्य भाषेत धमकी; जन्मदात्रीचाही केला उध्दार


मुंबई/ विशेष प्रतिनिधी -  सत्तेची हवा मस्तकात शिरली की शरीरातील रग जीभेत उतरून बाहेर पडणार्‍या प्रत्येक शब्दातून माज सहजपणे बाहेर पडतो, भारतीय जनता पक्षाच्या अशाच काही मुजोर लोकप्रति निधींचा माज गेल्या काही दिवसांपासून ओसंडून वाहू लागल्याने प्रशासनाला काम करणे जिकरीचे बनले आहे. अहमदनगर मनपाचा हराम प्रवृत्तीचा भाजपेयी उपमहापौर, विदर्भातील भाजपाचा एक आमदार यांचा प्रशासनावर मुजोरी दाखविणारा ऑडीओ व्हायरल झाल्यानंतर अंधेरी विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार अमित साटम यांचीही मुजोरी व्हायरल झाली आहे. महापालिका बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लाखोली वाहून जन्मदात्रीचा केलेला उध्दार राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. या अश्‍लाघ्य धमकी नंतर मनपा बांधकाम विभागातील अभियंत्यांनी धसका घेतला असून लोकप्रतिनिधींना अपेक्षित निधी द्यायचा कुठून? काम करायचे कसे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. दरम्यान आ. साटम यांच्या असंस्कृत उद्दामगीरीचा सर्वत्र निषेध होत असला तरी हा आडिओ क्लीप मधील आवाज बनावट असल्याचा बचावात्मक पविञा आ. साटम यांनी घेतल्याने ऑडिओ क्लीपशी सत्यता पडताळल्यानंतरच या प्रकरणाशी शहनिशा होणार आहे.
सत्ता जनकल्याणासाठी राबवावी लागते हा ट्रेंड विद्यमान लोकप्रतिनिधींच्या पचनी पडत नसावा, अशा काही घडामोडी अलिकडच्या काळात वेगाने व्हायरल होऊ लागल्या आहेत. सत्ता आपल्या बापाची जहागीर आहे, असा समज करून घेत व्यवस्थेला ओलीस ठेवण्याची लत बहुतेक लोकप्रतिनिधींना लागल्याचे पदोपदी दिसते. अर्थात सर्वच सत्ताधारी लोक प्रतिनिधी मुजोर असतात असा दावा करता येणार नाही. या सन्माननीय लोकप्रतिनिधींचा आदर राखायला हवा. त्यांची माफी मागुन मुजोर, सत्तेची घमेंड असलेल्या लोकप्रति निधींचा माज उतरविण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाने बजावण्याची वेळ आली आहे.
दोन महिन्यापुर्वी विदर्भातील एका भाजपा आमदाराने शासकीय कंत्राटदाराला हप्ता देत नाही म्हणून भ्रमणध्वनीवर दिलेल्या अर्वाच्च शिव्या व्हायरल झाल्या होत्या. त्या नंतर अहमदनगरचा मनपाचा भाजपेयी उपमहापौर छिंदमनेही मनपा कर्मचार्‍याला शिवीगाळ करतांना छत्रपतींचा केलेला अवमान व्हायरल झाल्यानंतर सत्तेचा माज चर्चेत आला होता. अंधेरी (प.) मतदार संघातून भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आलेले आ. अमित साटम यांनीही मुंबई महापालिका बांधकाम विभागाचे विभाग के/वेस्ट वॉर्ड एमसीजीएमचे कार्यक ारी अभियंता पवार यांना केलेली अश्‍लिल शिवीगाळ व्हायरल झाल्याने भाजप आमदारांचा मुजोरपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कार्यकारी अभियंता यांना आ. साटम सतत फोन करीत असुन त्यांचा फोन पवार घेत नाहीत म्हणून अहंकार दुखावलेल्या साटम यांनी पवार यांचे शाखा अभियंता राठोड यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून अतिशय खालच्या पातळीवर, अश्‍लिल शब्दात शिव्यांची लाखोली वाहीली. पवार यांच्या आईचा अश्‍लाघ्य शब्दात उध्दार करून धमकावले. या व्हायरल ऑडिओत वापरलेल्या प्रत्येक शब्दातून सत्तेचा माज प्रतिध्वनीत होत आहे. या आमदारांना सत्तेचा असंकार इतका आहे की अभियंता असोसिएशनने त्यांच्या विरूध्द मोर्चा काढण्याचे आव्हान देण्याचे सोपस्कारही पार पाडले. या आणि अनेक घटनांमधून सत्तेची हवा डोक्यात गेलेले हे लोकप्रतिनिधी व्यवस्थेला रखेल समजतात. हेच सिध्द होते.
या संदर्भात प्राप्त माहीती अशी की कार्यकारी अभियंता पवार यांच्या अधिकारात के/पश्‍चिम वॉर्डात इमारत बांधकाम सुरू आहे. हा प्रभाग आ. साटम यांच्या विधानसभा मतदार संघात असल्याने साटम यांनी पवार यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली, आमदारांच्या भितीपोटी पवार त्यांचा फोन घेत नाही. म्हणून आमदारांनी राठोड यांना फोन करून अश्‍लाघ्य भाषेत धमकावले असा असा आरोप केला जात आहे. दरम्यान या ऑडिओ क्लीपमधील आवाज माझा नाही तर छेडछाड केलेली क्लीप व्हायरल केली जात असल्याचा बचावात्मक पवित्रा आ. साटम यांनी घेतला आहे. या क्लीपची फोरन्सिक पडताळणी झाल्यानंतर यातील व्हायरल सत्य समोर येणार असले तरी तोपर्यंत आरोपीच्या पिंजर्‍यात उभे असलेल्या आ. साटम यांना समाजाच्या विविध स्तरांवरून होणार्‍या टीकेला सामोरे जावे लागणार आहे.


प्रसिध्द प्रवचनकार भाजपाचे महान आ. अमित साटम यांच्या अमोघ वाणीने कान तृप्त झाले. या आधीही त्यांनी आपल्या महान वाणीने फेरीवाले व पोलीसांचे प्रबोधन केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा क्लीन चीटसहीत जाहीर सत्कार करावा व संघ प्रार्थनेनंतर या वाणीचे पारायण परमनीतीमान संघाच्या शाखेत व्हावे.
--सचिन सावंत,
प्रवक्ता,महा.प्रदेश कांग्रेस