Breaking News

अग्रलेख - चीनचे वाढते उपद्रवमूल्य !


चीन हा भारताच्या जवळचे शेजारी राष्ट्र. मात्र अलीकडच्या काळात पाकसारख्या कुरापती सातत्याने सुरू आहे. सिक्कीम, डोकलाम या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करून भारताला शह देण्याचा केविळवाणा प्रयत्न चीनने सुरू केला आहे. चीनची पाकशी वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय आहे. वास्तविक भारताची अमेरिकेसोबत वाढती जवळीक चीनसाठी चिंतेचा विषय झाल्यामुळेच चीनने आपले धोरण बदलवत भारताला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताची शेजारी राष्ट्र असलेले चीनची भूमिका नेहमीच संशयातीत राहिली आहे. चीनने भारतासोबत शेजारधर्म निभवतांना नेहमीच संशयित भूमिका ठेवली आहे. त्यामुळे चीनप्रती भारताने कधीही गाफील राहू नये, म्हूणन भारताने आपल्या परराष्ट्रीय धोरणात बदल केला. चीनच्या महासत्तेला सुरूंग लावण्याची क्षमता भारतामध्ये आहे, हे एव्हाना चीनला कळून चुकले आहे. भारताची आर्थिक क्षेत्राची घौडदौड ही वेगांने होतांना दिसून येत आहे. तसेच चीनच्या इतर देशांसोबत असलेली विंतडवादाच्या भूमिकेमुळे चीनला मित्र देखील मिळू शकत नाही. याउलट भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरांवर विविध देशांसोबत संवाद साधत विकसावर भर देण्याची क्रिया अनेक देशांना सुखावून गेली आहे. भारताची होणारी प्रगती चीनच्या डोळया नेहमीच खुपत रा हिली आहे. त्यामुळे भारताच्या विकासाच्या मार्गात अडचणी कशा आणता येईल, भारत अशांत कसा राहील यासाठी चीनकडून वेळोवेळी पाकला रसद पुरविण्याचे काम देखील केले आहे. मात्र चीनने हिंदी महासागरात नौका उतरून पुढील युध्दासाठी तयार राहा असा शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चीनने सिक्कीम प्रांताला लक्ष्य करत सैनिकांची गस्त वाढवली आहे. सिक्कीम प्रांतात चीनची घुसखोरी करून चीन भारतातील शांतता भंग करू इच्छितो. मात्र चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय सैन्य व उपग्रहांच्या माध्यमातून बारीक लक्ष्य ठेवून आहे. भारताची अवस्था 1962 सारखी करू, ही चीनची पोकल धमकी असून, 1962 च्या तुलनेत भारत सर्वच क्षेत्रात पुढारलेला असून, तो चीनला चोख उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचे चीनच्या लक्षात आलेच असणार. तरीही चीनकडून भारताची राजनैतिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. चीनच्या प्रसारमाध्यमांनी भारत आणि चीनचे संबध आणखी ताणले जातील याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे. मात्र दोन्ही देशांत विकासात्मक आणि रचनात्मक बदलासाठी पुढे आले पाहिजे. आशिया खंडातील या दोन्ही देशांमध्ये वर्चस्व गाजवण्याची, आणि मातब्बर देशांची मक्तेदारी मोडीत काढण्याची क्षमता आहे. मात्र चीनची आढयतखोर भूमिकेमुळे चीन विश्‍वासपात्र नाही, अशीच भूमिका वि विध देशांची बनत असल्यामुळे यापुढे चीनसोबत सहकार्य करतांना चीनची भूमिका तपासून घेण्याची वेळ आलेली आहे. तसेच पाकची पार्श्‍वभूमी माहित असतांना देखील केवळ भारताचा शत्रू म्हणून चीन पाकमध्ये आर्थिक गुंतवणूक करत आहे. भारतात दहशतवाद पोसण्यासाठी चीनकडून नेहमीच पाकिस्तानातील दहशतवादी संंघटनांना शस्त्रासासह, आर्थिक रसद पुरविण्याचे काम करण्यात येत आहे. चीनच्या या संशयाती भूमिकेमुळे चीन युध्द पुकारू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतांने सिक्कीमच्या डोंगलांंगमधून सैन्य हटविण्याची मागणी चीनने करत, भारताला नमते घेण्यासाठी चीन भाग पाडत आहे. त्यासाठी चीनी नागरिकांना भारतात जाऊ देणार नाही, भारतात असलेल्या चीनी नागरिक ांना परकत बोलावून घेऊ. असा गर्भित इशारा देऊन चीन भारताची मानसिकता तपासत आहे. मात्र भारत चीनच्या दबावाला बळी पडत नाही, हे बघून चीनची कोंडी झाली आहे.