Breaking News

महिला कुटुंबास सुसंस्कृत करतात - एम. पी. साळवे

सर्वसाधरण कुटुंबात दैनंदिन कामाबरोबरच एक सुसंस्कृत दिशा देण्याचे काम महिलाच करत असतात असे प्रतिपादन नगर अर्बन बँकेचे प्रमुख व्यवस्थापक एम. पी. साळवे यांनी केले.अर्बन बँकेच्या कर्जत शाखेत महिला दिनानिमित्त सन्मान महिलांचा या कार्यक्रमात बोलत होते. साळवे पुढे म्हणाले की, बँकेचे चेअरमन खा. दिलीप गांधी यांच्या संकल्पनेतुन व पुढाकारातुन 47 शाखांत महिला सन्मान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

संसाराचा गाडा हाकताना पतीसोबत रोजीरोटीचा संघर्ष हा त्याच्या जीवनातील नित्याचा भाग बनला आहे. अशा परिस्थितीतही महिला मात्र पैशाची पइ न पइ बचत करत असते. हे विशेष योगदान त्यांनी मिळवले आहे. असे गौरवोद्गार साळवे यांनी काढले.या कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंथनचे तालुका प्रतिनिधी सुभाष माळवे हे होते. यावेळी व्यवस्थापक सुनिल गाडे, गणेश कानडे, राहुल जाधव, विजय इंगळे, अजित डाके, संतोष बिटके, अमोल शिंगाडे आदी उपस्थित होते. तर आभार माया मोरे यांनी मानले.