Breaking News

मुलीला वाचवण्यासाठी जेटली गप्प : राहुल गांधी


नवी दिल्ली : आपल्या वकील मुलीला वाचवण्यासाठी अरूण जेटली 12 हजार 600 कोटींच्या पीएनबी घोटाळ्याविषयी गप्प आहेत, असा आरोप करत जेटलींच्या मुलीच्या कं पनीवर धाड का टाकण्यात आली नाही? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी अर्थमंत्री अरूण जेटलींच्या गप्प राहण्यामागे वकील असलेल्या मुलीला वाचवण्याचा उद्देश आहे, हे आता समोर आले आहे. घोटाळा समोर येण्याच्या एक महिन्यापूर्वी जेटलींच्या मुलीकडे आरोपीने मोठी आगाऊ रक्कम जमा केली होती. जेव्हा आरोपीच्या इतर कायदेविषयक सल्ला देणार्‍या कंपन्यांची सीबीआयद्वारे चौकशी करण्यात आली तेव्हा तिच्या कंपनीची चौकशी का करण्यात आली नाही? असे गांधींनी ट्विटद्वारे म्हटले आहे.