Breaking News

पदाची लालसा आम्हाला नाही - सुभाष देसाई

सिंधुदुर्गनगरी, दि. 12, मार्च - शिवसेना सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहणार आहे. ज्या प्रकल्पाला जनतेचा विरोध असेल त्याला शिवसेनेचा विरोधच करेल. जनतेच्या हितासाठी वेळ प्रसंगी मंत्रीपदाचा राजीनामा देऊ. कारण पदाची लालसा आम्हाला नाही, असा घणाघात शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केला. 
शिवसेनेचा सावंतवाडी विधानसभा मतदार संघ मेळावा संपन्न झाला. देसाई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी देसाई यांनी विरोधकांवर जहरी टीका केली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांनी लक्ष्य केले. लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यसाठी शिवसेना केव्हाही सज्ज असल्याचे त्यांनी सांगितल. सिंधुदुर्गमधील समुद्र किनारपट्टी हद्दीत परप्रांतीय मच्छिमारावर देखरेख ठेवण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आता शिवसैनिकांचे पथक तयार करा असा आदेश त्यांनी दिला. पालकमंत्री दीपक केसरकर यांचे त्यांनी अभिनंदन केले.सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण राज्यात आर्थिक बाबतीत श्रीमंत करणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले. मच्छिमार, शेतकरी, तसेच सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार असून कोण काय टीका करतो याकडे लक्ष देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केल.