Breaking News

कृषी व्यवसाय व्यवस्थान महाविद्यालयाचा जलदिन उत्साहात


प्रवरा ग्रामीण शिक्षणसंस्थेच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. पाणी हे जीवनासाठी महत्वाचे त्याचे जतन व भविष्यातील भीषण दुष्काळाला तोंड कसे द्यावे, याबाबत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. खंडागळे यांनी माहिती दिली.

कृषी व्यवसाय व्यवस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर यांनी शेती आणि पाणी याचे संतोलन कसे ठेवावे व पाण्याचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सचिन गोंदकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. आर. विखे उपस्थित होते. यावेळी पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना वृक्षवाटप करण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले. लावण्यात आलेल्या वृक्षाचे ४ वर्षे संगोपन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. डी. एन. कार्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. खर्डे एस. ए. यांनी ‘जल बचाओ’ शपथ विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना घालून दिली. या कार्यक्रमासाठी प्रा. क्षीरसागर आणि अन्य कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. एस. आर. वर्पे यांनी आभार मानले.