राशीनची यमाई देवी आणि महादेवांचा रंगला पारंपरिक विवाह सोहळा
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कर्जत तालुक्यातील राशीनच्या जगदंबा (यमाई) देवी मंदिरात रविवारी रात्री तेलवण अष्टमीचा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात यमाई देवी व महादेवाचा विवाह सोहळा चांगलाच रंगला. चैत्र व मार्गशिर्ष या महिन्यातील दुर्गाष्टमीला हा विवाह सोहळा पारंपरिक पध्दतीने सालाबादप्रमाणे साजरा झाला.
देवीला व महादेवांना गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. हळकुंडाचे काकण बांधून देवीला व महादेवाला फुलांच्या मंडोळ्या घालण्यात आल्या. देवीची महावस्त्रलंकार पूजा बांधण्यात आली. गावातील महिलांनी मंदिरात एकत्र येवून देवीच्या धुपारतीवेळी तेलवणाचे गाणे म्हणत देवीला तेलवण लावण्यात आले. यमाई देवी व महादेवाचा विवाह करण्याची पारंपरिक जपण्यात आली. या कार्यक्रमानंतर पानाचे विडे महिलांना देण्यात आले. देवीला तेलवण लावण्याची प्रमुख सेवा परिट समाजातील महिलेला देण्याची परंपरा आहे. हा दिमाखदार सोहळा यंदाही उत्साहात संपन्न झाला. सोहळा संपताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
पारंपरिक तेलवण पध्दती
यमाई देवीच्यापुढे चोळीच्या खणावर धान्याची रास घातली जाते. या रासीवर मध्यभागी तेलाचे भांडे ठेवले जाते. वेताच्या काठीच्या टोकाला सुताच्या धाग्याच्या सहाय्याने नागिणीचे पान बांधले जाते. त्या काठीच्या पानाचे टोक तेलाच्या भांड्यात बुडवून देवीला महिरप तेल लावले जाते. यावेळी तेलवणाचे गाणे म्हणत ही प्रकिया केली जाते.हीच प्रक्रिया महादेवाच्या मंदिरातही होते.