Breaking News

नामपुरला जिल्हा बँकचा वाहन लिलाव उधळला

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने 25 ते 30 ट्रॅक्टर जप्त केले होते. या सर्व वाहनाचा लिलाव करण्याचे प्रयोजन नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने मंगळवार दि. 20 रोजी सकाळी 11 वा. प्रयोजन ठेवले होते. नळकस रस्त्यावर होणार्‍या या जाहिर लिलावासाठी नियोजित वेळेनुसार बँक प्रशासनाने जय्यत तयारी करून लिलाव सुरु केला. मात्र शेतकरी नेते दीपक पगार, लालचंद सोनवणे, खेमराज कोर, भास्कर सोनवणे, समीर सावंत, रमेश अहिरे, दगाजी बच्चाव, एकनाथ देवरे, देवीदास सोनवणे, अनिल निकम, राजीव सावंत या नेत्यांनी जिल्हा बँकेच्या लिलावास जाहिर विरोध केल्याने बैंक अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी नेत्यांमध्ये यांच्यात शाब्दीक चकमक झाली. 

आम्हाला अटक झाली तरी चालेल परंतु आम्ही मागे हटनार नाही. लिलाव होवू देणार नाही असे बंड पुकारल्यामुळे लिलाव स्थळी मोठा संघर्ष निर्माण झाला होता. अखेर जिल्हा बँकेने शेतकरी नेत्यांच्या आक्रमकतेसमोर नांगी टाकून लिलाव मागे घेतल्याचे जाहिर केले. यात लिलावात सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांचे डिपॉज़िट बँकेने परत केले असून जिल्हा ब ँकेचे चेअरमन केदाजी आहेर यांनी मोबाइलवरुन संपर्क साधुन शेतकर्‍यांना विनंती करण्याची शिष्टाईही अपयशी ठरली. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे हा लिलाव बंद पाडण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शेतकरी एकजुटीचा विजय असो, या घोषणा देत परिसर दणाणला होता. संपूर्ण राज्यात लिलाव रोखण्याचा हा पहिलाच प्रोयोग यशस्वी झाल्यामुळे शेतकरी आंनद व्यक्त करीत असून आगामी काळात सुद्धा जिल्हा बँकेने शेतकर्‍याकडून कर्ज व वाहने वसूल केल्यास या पेक्षा उग्र स्वरुपात मोर्चे, आंदोलन केली जातील, असा इशारा दीपक पगार, लालचंद सोनवणे, खेमराज कोर, राजीव सावंत, समीर सावंत या नेत्यांनी दिला असून नामपुरचा लिलाव उधळल्यामुळे जिल्हा बँक पुढे काय निर्णय घेते, याकडे सर्वाचे लक्ष लागले असून शेतकर्‍यांच्या आक्रमक पावित्र्यांमुळे कर्जदार शेतकर्‍यांना व वाहनधारकाना दिलासा मिळाला आहे.