Breaking News

संजीवनीची हायब्रीड कार देशात दुसरी : कोल्हे


कोपरगांव: इम्पेरिअल सोसायटी आॅफ इनोव्हेटीव्ह इंजिनिअर्स (आयएसआयई), इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या कार डीझाईने ते फाॅर्मुला रेसिंग स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी बनविलेल्या हायब्रीड कारने सर्व कसोट्यांमध्ये देशात दुसरा व बेस्ट अॅक्सिलरेशन कसोटी मध्ये देशात पहिला तर महाराष्ट्रातून सर्व बाबतीत पहिला क्रमांक पटकाविला. रेसिंग स्पर्धा गलगोटीया विद्यापीठ, नाॅईडा व बुध्द इंटरनॅशनल सर्किट, नाॅईडा येथे घेण्यात आल्या. या विजयाने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय नाविण्यपुर्ण प्रकल्पांच्या उभारणीसाठी अग्रेसर असते हे पुन्हा एकदा अधोरखित झाले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे सांगीतले की आयएसआई मार्फत ब्रीक्स अॅण्ड स्ट्रॅटन कंपनीचे ३०६ सीसी चे इंजिन पुरविण्यात आले होते तर २ किलोवॅट ची बीएलडीसी इलेक्ट्रिकल मोटर विध्यार्थ्यानी उपलब्ध केली. एकुण २९ विध्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी प्रथम कार डीझाईनचे सादरीकरण के.एल. विद्यापीठ, विजयवाडा येथे दिले. तेथुन त्यांना कार डीझाईन करण्याची परवानगी देण्यात आली. या विध्यार्थ्यानी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. ए. जी. ठाकुर, इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. बी. एस. आगरकर, प्रा. हेमंत गुरव, प्रा. अक्षया चव्हाण व प्रा. पी. व्ही. ठोकळ यांच्या मार्गदर्षनाखाली महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा व वर्कशॉप  मध्ये या हायब्रीड कारचे फॅब्रिकेषन केले. विध्यार्थ्यांच्या या समुहामध्ये मुलींची संख्या ५२ टक्के होती. ही रेसिंग कार पेट्रोल इंजिन व इलेक्ट्रिकल मोटरवर चालत असल्यामुळे पर्यावरणाभिमुख आहे. या कारचे वजन २७० किलो असुन इलेक्ट्रिकल मोटर चालविण्यासाठी ४८ व्होल्ट, अॅम्पिअरअवर क्षमतेची लिथियम आयर्न बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ही कार तासी ८५ किमी वेगाने धावु शकते . माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांचे मार्गदर्शनानुसार विध्यार्थांकडून नेहमी नाविण्यपुर्ण प्रकल्पांची निर्मीती झाली पाहीजे असा आग्रह असतो, असे कोल्हे शेवटी म्हणाले.

विध्यार्थ्यांच्या या यशाबद्धल संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी कॅप्टन महेश मोरे , व्हाईस कॅप्टन विनायक रोहम, ड्रायव्हर्स भूषण मोरे व प्राजक्ता काळे, संसपेंषन हेड मृनालिनी विधाते, बे्रकिंग हेड प्रशांत सोनवणे, स्टीअरींग हेड भूषण चौधरी , रोल केज प्रमुख अनिकेत बनकर, ट्रान्समिशन हेड स्वप्नील चौधरी , इलेक्ट्रिकल सिस्टीम प्रमुख भाग्यश्री हिवाळे, मॅन्युफॅक्चरींग हेड अमोल भोरकडे, ट्रेझरर समाधान ढमाले, सोशल मिडीया प्रमोशन प्रमुख कुनाल पाटील यांच्यासह सर्व सहभागी मुले व मुलींचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य डाॅ. क्यातनवार व विभागप्रमुख उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये देशातील प्रथम फेरीसाठी १०२, दुसऱ्या फेरीत ४५ व अंतिम फेरीत ८ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. प्रचंड अटीतटीची स्पर्धा असताना देखिल विध्यार्थ्यांनी आत्मविष्वासाच्या जोरावर व प्राद्यापकांच्या मार्गदर्षनाखाली ही स्पर्धा जिंकली याबध्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापुर्वीही संजीवनीच्या विद्याथ्र्यांनी वेगवेगळ्या कार रेसिंग स्पर्धेत बक्षिसे मिळविली आहेत.