Breaking News

800 ते 1000 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मंगळवारी दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल रोको केला होता. या प्रकरणी आता आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच 800 ते 1000 विद्यार्थ्यांच्या जमावावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी माटुग्यांत रेल्वे अ‍ॅप्रेंटिस विद्यार्थी संघटनेने मंगळवारी सकाळी दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल साडे 3 तास मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत होती.