Breaking News

पोलिसांच्या कुटुंबातील महिलांचा सत्कार


जळगाव, दि. 10, मार्च - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर तालुक्यातील पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील महिलांचे समाजातील महत्व व त्याग समाजाला कळावा म्हणून त्या महिलांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला. प्रांत अधिकारी संजय गायकवाड यांच्या पत्नी दीप्ती गायकवाड,डी. वाय. एस. पी. रफिक शेख यांच्या पत्नी सुरैय्या शेख,तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ. मिना दामोदरे,महिला पत्रकार जिल्हाध्यक्षा प्रा.जयश्री साळूंखे,जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ संदांनशीव, जिल्हाउपाध्यक्ष जयवंत वानखेडे,ऍड. तिलोत्तमा पाटील,आधार संस्थेच्या रेणुका प्रसाद व भारती पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला.तसेच साप्ता प्रजाराज्यामचे मुख्यसपादक जयेश काटे यांना पर्यावरण रत्न पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा याप्रसंगी मान्यवर माहिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रक ार संघाचे तालुका अध्यक्ष सुनील करंदीकर हे उपस्थित होते.